कोरेगाव (संजय कदम)
राज्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका 7 फेब्रुवारीला होत आहेत या निवडणुकांची राजकीय रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान दुर्घटनेट मृत्यू झाल्याने जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकानी शांततेचा मार्ग धरला आहे.
सातारा जिल्ह्यात हे वातावरण असले तरी सध्या प्रत्यक्ष मतदार भेटी वर सर्व उमेदवारांनी आता जोर दिला आहे
कोरेगाव तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद गटात चित्र विचित्र आघाड्या दिसत आहेत जिल्ह्यात सर्वत्र भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटले असले तरी तालुक्यात मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची आघाडी झाली आहे.
तालुक्याच्या उत्तर भागात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण असणारे उमेदवार या गटात असल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासून या गटावर अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे.कुणबी मराठा हा या गटातील कळीचा मुद्दा ठरला आहे.राष्ट्रवादी चे दोन्ही गट एकत्रित आले असून घड्याळ या एकाच चिन्हावर राष्ट्रवादी चे दोन्ही गट एकत्र काम करत आहेत.राष्ट्रवादी ने जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि याच गटातील अंबवडे गणाचे उमेदवार ओबीसी विरोधात कुणबी मराठा असा दिल्याने राष्ट्रवादी बाबत ओबीसी समाजावर अतिक्रमण केल्याचा राग येथील राजकीय नेते व्यक्त करत आहेत.
जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादी चे खासदार नितीन काका पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयश्री भोसले यांना उमेदवारी दिली आहे त्यांचे गाव या मतदार संघात नसल्याने आणि त्या कुणबी मराठा या दाखल्यावर लढत असल्याने या ठिकाणी जातीच राजकारण सुरू असल्याचे आरोप होत आहेत.तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांनी वाठार स्टेशन येथील सर्वसाधारण ओबीसी उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या गटात सध्या तरी काटे की टक्कर अशीच लढत दिसत आहे.यातच शिवसेना उबाठा गटानेही या गटात व गणात उमेदवार दिल्याने हे उमेदवार कुणाच्या पथ्यावर पडतात हे निकालानंतर स्पष्ट होईल या गटातील उमेदवारासाठी आमदार महेश शिंदे भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचार सभा घेऊन राष्ट्रवादी उमेदवाराबाबत खरपूस समाचार घेतला आहे निवडणुकीत पैसा जर काम करत असता तर देशाचा पंतप्रधान अंबानी झाला असता असा आरोप समोरच्या उमेदवारी बाबत केला आहे तर राष्ट्रवादी चे नेते खासदार नितीन काका पाटील,आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी या गटात सभा घेत शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी फसव्या पाणी योजना आणि रस्त्याचे राजकारण केल्याचा त्यांचावर आरोप केला आहे एकूणच आता दोन्ही बाजूने एक मेकावर आरोप प्रत्यारोप सुरू असून शेवटच्या दोन दिवसात अर्थकारण या गटाची खरी दिशा बदलणार का ? याचे उत्तर 9 फेब्रुवारीला स्पष्ट होईल सध्या तरी या गटात काटे की टक्कर अशीच परस्थितो आहे.
या गटातील अंबवडे गणात कुणबी मराठा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नीलेश जगदाळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारा समोर आव्हान उभ केलं आहे तर वाठार स्टेशन गणात रंजना भोईटे या भाजपा उमेदवाराने राष्ट्रवादी उमेदवारासोबत आव्हान उभे केल्याने या गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About the Author
Post Views: 168
