कोरेगाव दिनांक 27
शुक्रवार दिनांक २६/०२/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मौजे मरळी फॉ.कं.नं. ५०६ चे वनक्षेत्रामध्ये वणवा
लावणारे आरोपी बळवंत विठठल कदम. रा. मरळी ( कदमवाडी) ता. पाटण जि.सातारा आहे. सदर घटनेमध्ये ०१ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले असून वणवा वनविभागामार्फत तात्काळ विझवणेत आलेला आहे.
त्याचप्रमाणे दिनांक २७/०२/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मौजे घेरादातेगड (काटेवाडी )
फॉ.कं.नं. ४५८ चे वनक्षेत्रामध्ये वणवा लावणारे आरोपीवर प्र.गु.रि. क्र. ०२ / २०२६ दि. २७/०२/२०२६ अन्वये गुन्हा
नोंद करणेत आला असून सदर गुन्हयातील आरोपी लक्ष्मी कृष्णत मांडवकर रा. घेरादातेगड ( काटेवाडी ) ता. पाटण
जि.सातारा आहे. सदर घटनेमध्ये ०१ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले असून वणवा वनविभागामार्फत तात्काळ
विझवणेत आलेला आहे. दोन्ही गुन्हयातील आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (ब) (फ)
अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरचे वनगुन्हयासाठी ०१ वर्ष कारावास किंवा रू.५०००/- पर्यंतचा द्रव्य दंड किवा
दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.
पाटण वनपरिक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करणेत येत कि, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार
तसेच राखीव वनामध्ये अतिक्रमण करणे, वणवा लावणे हा कायदयाने गुन्हा आहे. असे घडल्यास संबंधितावर
वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई श्री.अमोल सातपुते ( भा.व.से) उपवनसंरक्षक वन विभाग सातारा, श्रीम.जयश्री जाधव
सहायक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा ) सातारा,यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेश नलवडे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पाटण, श्री. निलेश कुंभार वनपाल (प्रा.) पाटण, श्री मेघराज नवले वनरक्षक (प्रा.) बहूले, श्री निखिल कदम वनरक्षक (प्रा.) पाटण, श्री रोहित लोहार वनरक्षक (प्रा.) मोरगिरी, श्रीम. अयोध्या रन्हेर वनरक्षक (प्रा.) कारवट, श्री. रमेश कदम,श्री संजय जाधव कायम वनमजुर यांनी केली.
