filter: 0; fileterIntensity: -0.01; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: night;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 32;
वाठार स्टेशन परिसरातील बेरोजगार युवकांसाठी लवकरच एम आय डी सी उभी करणार आमदार शशिकांत शिंदे
रस्ते आणि पाणी योजनांचा फार्स नको
कोरेगाव दिनांक
अजित दादांच्या अकस्मित निधनाने राज्याचे फार मोठ नुकसान झालं आहे दोन्ही राष्ट्रवादी पाक्ष लवकरच एकीकरण होतील अशी परिस्थिती असताना दादांचा विमान दुर्घटनेत अकस्मित मृत्यू झाला यामुळे मोठी राज्याच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे दादा सारखा स्पष्ट बोलणारा नेता यापुढे होणे नाही अशा भावना व्यक्त करीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरील उभे असणारे सर्व उमेदवार निवडून देणं हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल अशा भावना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी वाठार स्टेशन येथील जाहीर प्रचारसभेत व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयश्री भोसले,अंबवडे गणाचे उमेदवार नीलेश जगदाळे,वाठार स्टे पंचायत समिती गणाच्या उमेदवार जाधव,उद्योजक राजेंद्र भोसले,कोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती रूपाली जाधव,माजी पंचायत समिती सदस्या मंगल गंगावणे,वाठार स्टेशन सरपंच सीमा चव्हाण,नागेश जाधव,माजी पंचायत समिती सदस्य अंकुशराव जाधव,सरपंच नरसिंग दिसले, देऊर माजी उपसरपंच राजेंद्र कदम कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय कदम,माजी नाना भिलारे,दत्तात्रय भोईटे,अजित भोईटे,दिलीप अहिरेकर,भाऊसाहेब वाघ यांच्या सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले मी राज्याचा जलसंपदा मंत्री होतो मात्र पाण्याबाबत कुठंही खोटी आश्वासन दिलं नाही मात्र तालुक्याचे विद्यमान आमदार केवळ पाणी योजनेचा खोटा डांगोरा पिटत आहेत पाणी मंजूर केलं या तलावातून त्या तलावात त्या तलावातून दुसऱ्या तलावात मला असले काम करणारा कोण इंजिनिअर आहे तो सापडला पाहिजे.मी आमदार असताना आर एम सी प्लांट टाकला नाही ही चूक झाली गावोगावी करोडो ची काम केल्याचे खोट बोर्ड लावण आम्हाला जमल नाही केवळ खोट बोल पण रेटून बोल एवढाच उद्योग हे महाशय करत आहेत..वाठार स्टेशन मध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवण्याचे काम होईल या भागात जर 150 एकर जमीन मिळाली तर या ठिकाणी खाजगी उद्योग आणून येथील बेरोजगारी दूर करण्याचा आपण प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अजय कदम ,देऊर ग्रामपंचायत सदस्या कविता देशमुख,माजी पंचायत समिती सदस्या मंगल गंगावणे,गणेश चव्हाण, राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्तकेले.
