कोरेगाव दिनांक 5
फडतरवाडी तालुका कोरेगाव येथील वनहद्दीत मंगळवारी वनकर्मचारी मार्फत रात्रगस्त करत असताना रात्री 12.30 च्या दरम्यान राखीव वनक्षेत्रात चोरतुट चालु असलेली गुप्त माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी वनअधिकारी श्री चंद्रहार
हणमंत जगदाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेगांव, श्रीमती सुरेखा राजेंद्र जगदाळे वनपाल वाठार, श्री.सुभाष दिलीप बडदे वनरक्षक वाठार श्री. विजय बाबासाहेब नरळे वनरक्षक जांब खु श्री. अजयबाजीराव कांबळे वनरक्षक वाघोली श्रीमती रूपाली गोकुळ परदेशी वनरक्षक बनवडी यांनी तात्काळ त्या ठिकाणी गेले असता चोरतुट करणारे तीन इसम पळून जातांना दिसले. त्यानंतरअधिक तपास
केला असता आरोपी, आरोपी क्र.1 राहुल दुर्यधन गायकवाड रा. विखळे व आरोपी क्र.2 सुरज मिनानाथ अडागळे रा. विखळे यांनी आरोपी क्र. 3 जयदिप मिनानाथ अडागळे यांच्या सांगण्यावरूनकटर मशीनच्या सहाय्याने 29 खैर वृक्षाची तोड केल्याचे दिसून आले तरी सदर आरोपी यांच्या विरुदध भारतीय वनअधिनियम 1927 कलम 26 (1) (a) (f) 42, 65-A अन्वये वनगुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयाकामी वापरण्यात आलेली मोटरसायकल क्र. MH-45-ARO476 तसेच कटर
मशीन व अनगड लाकुडमाल नग 39 जप्त करून ताब्यात घेतला आहे. दिनांक 04/02/2026 रोजी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोरेगांव यांनी एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते, (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या
मार्गदर्शनाखाली श्री.दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, श्री चंद्रहार जगदाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेगांव, श्रीमती सुरेखा जगदाळे वनपाल वाठार, श्री. सुभाष बड़दे वनरक्षक वाठार तसेच वनपरिक्षेत्र कोरेगांव येथील वनकर्मचारी यांचेसमवेत पार पडली असून पुढीलतपास श्रीमती सुरेखा जगदाळे वनपाल वाठार करीत आहेत..
.
