संजय कदम
कोरेगाव दिनाक 9
संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सातारा जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर मरगळलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा चार्जिंग झाली आहे
कोरेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना . या निकालाने धक्का दिला आहे
कोरेगावात एकूण 6 जिल्हा परिषद गटापैकी भाजप एका जागेवर तर राष्ट्रवादी 3 ,शिवसेना आमदार महेश शिंदे 2 जागेवर विजय मिळवला आहे.तर कोरेगाव पंचायत समिती गणावर राष्ट्रवादी काँग्रेस ने 9 जागवत विजय मिळवून झेंडा फडकवला आहे त्यामुळे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात भाजपा उमेदवार अमित चव्हाण हे 139 मतांनी विजयी झाले.तर या गणातील पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रुपाली साळुंखे तर सोनके गणातून राष्ट्रवादीचे आकाश बाळासाहेब सोळसकर विजय झाले
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जयश्री भोसले तर वाठार स्टेशन गणातून भाजपा उमेदवार अनिता अरुण भोईटे व आंबवडे गनातून राष्ट्रवादी चे निलेश जगदाळे विजयी झाले.सातारारोड जिल्हा परिषद शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सारिका रत्नदीप फाळके तर गणातून राष्ट्रवादी चे संजय आवडे व किन्हई गणातून शिवसेना उमेदवार सुरेखा पाटील विजयी झाल्या
कुमठे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे हणमंत जगदाळे विजयी झाले गणातून राष्ट्रवादी उमेदवार स्वाती संदीप जाधव व लासूरने गणातून राष्ट्रवादी उमेदवार रूपाली गुरव विजयी झाल्या.
एकबे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी उमेदवार राजेश्वरी दयानंद भोसले तर गणातून राष्ट्रवादी उमेदवार केतन चव्हाण तर साप गणातून राष्ट्रवादी उमेदवार अजिंक्य कदम विजयी झाले.
वाठार किरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संध्या रजनी भोसले गणातून राष्ट्रवादी उमेदवार निकिता चंद्रकांत गिरी तर आर्वी गणातून राष्ट्रवादी उमेदवार रवींद्र पवार विजयी झाले.
About the Author
Post Views: 279
