आमदार महेश शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का…
वाठार स्टेशन गटात. काय घडलं ….काय बिघडलं…
कोरेगाव संजय कदम
राज्यात जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात अखेर दोन कुणबी उमेदवारांनी विजय मिळवून सत्ताधारी शिवसेना आमदार महेश शिंदे यांना धक्का दिला आहे त्यामुळे या गटातील कुणबी मराठा विरोधात ओ बी सी वाद आता हद्दपार झाला आहे
या गटातील व अंबवडे गणातील ओबीसी आरक्षित जागेवर ओबीसी समाज्याचीच उमेदवारी असावी या ठिकाणी कुणबी आरक्षण चालू देणार नाही असा मोठा वाद हा या गटातील चर्चेचा प्रमुख मुद्दा होता या साठी आमदार महेश शिंदे गटाने मोठा विरोध केला त्यामुळे कुणबी विरोधात मराठा असा सामना रंगला या गटात आणि गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही कुणबी उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले मात्र या गटात आमदार महेश शिंदे यांचा पराभव का झाला या गटात नक्की काय घडलं आणि काय बिघडलं याची चर्चा होणे तर गरजेच आहे. या बाबत या गटातील घडामोडीचा घेतलेला सविस्तर आढावा….
कोरेगाव आणि फलटण या दोन विधानसभा मतदार संघात विभागलेल्या वाठार स्टेशन गटात कोरेगाव चे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी भाजप चे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर युती केली तर त्यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार रामराजे गट यांनी लढा दिला त्यामुळे हा गट राजकीय चर्चेत राहिला.
वाठार स्टेशन गटात वाठार स्टेशन गणातील 80 टक्के भाग हा फलटण विधानसभा मतदार संघातील आहे तर 20 टक्के मतदान हे आमदार महेश शिंदे यांच्या मतदार संघातील आहे त्यामुळे या गणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप उमेदवारांना संधी दिली तर या गटातील अंबवडे संमत वाघोली हा संपूर्ण गण आमदार महेश शिंदे यांच्या मतदार संघात येतो त्यामुळे या गटात आमदार महेश शिंदे यांची भूमिका महत्वाची मानली जात होती.
मात्र या गटात आणि गणात झालेले मतदान पाहता वाठार स्टेशन गणात शिवसेना उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांना 5 हजार 17 मते मिळाली तर राष्ट्रवादी उमेदवार जयश्री भोसले यांना 5 हजार 629 मते मिळाली या गणात राष्ट्रवादी उमेदवाराने 612 चे या मताधिक्क मिळवले मात्र या गणात भाजप उमेदवार अनिता भोईटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा 500 ते 600 मते अधिक मिळाली तर याच गणात शिवसेना उबाठा उमेदवार यांना 621 मते मिळाली यामध्ये राष्ट्रवादी उमेदवार पराभूत होऊन भाजप उमेदवार अनिता अरुण भोईटे विजयी झाल्या.या गणात एका अपक्ष उमेदवारासह तीन उमेदवार असल्याने राष्ट्रवादी उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.
तर आमदार महेश शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या अंबवडे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणबी उमेदवार निलेश जगदाळे आणि जिल्हा परिषद गटाचे कुणबी उमेदवार जयश्री भोसले यांना 3 हजार 35 एवढ मताधिक्क मिळालं म्हणजेच जिथ करोडो रुपयांची विकास काम झाली सर्व गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता.आमदार महेश शिंदे यांच्या असतानाही त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी ने मताधिक्य मिळवले खरंतर या गणात राष्ट्रवादी ने दिलेली उमेदवारी ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू ठरली आहे मात्र आमदार महेश शिंदे यांनी दिलेली ओबीसी उमेदवारी फार काही करिष्मा दाखवता आला नाही विशेष म्हणजे ज्या गावातील ही उमेदवारी आहे त्या बनवडी गावानेही त्यांना साथ दिली नाही हे या गणातील अपयशाचे प्रमुख कारण मानलं जात आहे.याठिकाणी आमदार महेश शिंदे यांनी अंबवडे किंवा रेवडी या गावातील उमेदवारी दिली असती तर थोडा फार बदल दिसला असता.याशिवाय आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या गटात नियोजनाचा अभाव जाणवला यामध्ये बाहेरील मतदान जेवढ आणण गरजेच होत ते आलं नाही याशिवाय कुणबी मराठा बाबत केलेला उठाव ही या गटातील अपयशाची कारण आहेत.
About the Author
Post Views: 192
