आजच्या भाजपच्या दिमागदार कार्यक्रमाच्या फलकांवर महेश शिंदे यांची छबी उजळली
सातारा समाचार वृत्तसेवा
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा सातारा शहरात दिमाकदार नूतन सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला मात्र जिल्हा परिषदेच्या निवडीवरून भाजप शिवसेनेत झालेल्या दुराव्यामुळे या कार्यक्रमांच्या फलकावर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो देखील वापरण्यात आला नव्हता तो हटवला गेला होता मात्र आज भाजपच्या होणाऱ्या दिमागदार कार्यक्रमात आमदार महेश शिंदे भाजपच्या फलकावर झळकलेले पाहायला मिळाले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी भाजपचा हात धरत आपल्या विद्यमान पत्नी डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांना कुणबी प्रमाणपत्रावर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर बसवण्यात यश आले. यावेळी शिवसेनेची त्यांनी पूर्ण फारकत घेत शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावे लागले याच त्यांच्या राजकीय निर्णयाचा शिवसेनेने पक्ष संघटनेत चर्चा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सेनेचे आमदार महेश शिंदे यांची तक्रार करीत महेश शिंदे हे शिवसेनेच सकारात्मक राजकारण करत नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते अशातच नूतन जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात महेश शिंदे यांना विश्वासात न घेता त्यांचा कोठेही नामोल्लेख किंवा साधा शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर त्यांचा फोटो देखील हटवण्यात आला होता तर त्यांच्याच कोरेगाव मतदार संघात त्यांचेच निष्ठावंत म्हणून समजले जाणारे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेने ताकद देत कोरेगाव मतदार संघात आपली पकड मजबूत करण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेने ताकद देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेताना महेश शिंदे यांना देखील बाजूला ठेवण्यात आले त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेत दुखावलेले व शिवसेनेला दुखावणारे महेश शिंदे हे शिवसेनेपासून लांब गेलेले पाहायला मिळाले त्यानंतर काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजप ने बाजी मारली याचा जल्लोष आमदार महेश शिंदे यांनी कोरेगावत केला होता
अशातच 15 मे रोजी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर महेश शिंदे यांची छबी झळकलेली पाहायला मिळाली तर शहरात भाजपच्या वतीने लावण्यात आलेले फ्लेक्स फलकावर देखील महेश शिंदे झळकलेले पाहायला मिळाले त्यामुळे महेश शिंदे हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना ?अशीच चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात उमटत आहे
भाजप सदस्य नोंदणी कोरेगाव विधानसभा अग्रेसर विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा प्रतिसाद देखील मिळाला सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जवळपास 80 हजाराहून अधिक सदस्य भाजपसोबत या मतदारसंघातून जोडले गेले आहेत एकीकडे शिवसेनेचे आमदार या ठिकाणी कार्यरत असताना भाजपने 80 हजाराहून अधिक सदस्य नोंदणी केल्याने ही सदस्य नोंदणी करण्यात महेश शिंदे यांचाच मोठा हात असल्याची चर्चा होत आहे
