आर्थिक फसवणूक प्रकरणी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सातारा दिनाक 10
मुंबई मध्ये झालेल्या आदर्श घोटाळ्यानंतर राजधानी सातारा जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात नावलौकिक असलेल्या आदर्श वास्तू निर्मिती कंपनी कडून फ्लॅट विक्रीत मोठा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप याच कंपनीत काम करणाऱ्या नेले किडगाव येथील अजय सदाशिव जाधव यांनी केला आहे .
या कंपनीने फलटण येथील यशवंत बँकेशी संगनमत करून कंपनीच्या सैदापूर येथील आदर्श उत्तरा या प्रकल्पात 704 क्रमांकाचा फ्लॅट नोटरी अग्रीमेंट करून माझ्या नावे 12 लाख रक्कम उचलली मात्र ही रक्कम बँकेस न भरता असणारा फ्लॅट ही तिसऱ्याच व्यक्तीला विक्री केला यामुळे अजय जाधव यांच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे या बाबत त्यांनी कंपनी कडे मला फ्लॅट द्या किंवा माझं कर्ज भरा अशी मागणी केली असून या बाबत कंपनी चे सर्व संचालक टाळाटाळ करत असल्याने या संचालक मंडळावर तत्काळ आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी अजय जाधव हे वाढे फाटा येथील आदर्श ग्रुप च्या आदर्श वास्तू निर्मिती प्रा. ली या कंपनीत गेली 15 वर्षापूर्वी पासून काम करत होते यावेळी या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुनील शामराव धुमाळ, सुधाकर जयवंत अनपट, विक्रम महादेव बोराटे व व्यवस्थापक प्रदीप उत्तमराव धुमाळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी ३० मार्च २०१९ रोजी आदर्श उत्तरा फ्लॅट नंबर ७०४ सातवा मजला, सैदापूर तालुका जिल्हा सातारा या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी करावा असे सांगितले होते यावेळी. माझ्याकडे फ्लॅट खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम नसल्याच जाधव यांनी त्यांना सांगितलं यावेळी त्यांनी जाधव यांना दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा सातारा यांच्यामार्फत कर्ज मिळवून देतो. आणि याबाबत लागणारे कागदपत्रे आम्ही कंपनी म्हणून तुम्हाला
देतो. काही कालावधीसाठी हे कर्ज प्रकरण असून आमचे मोठे कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कर्जामधून बाहेर काढले जाईल.तसेच हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कंपनीची राहील असे सांगून माझ्या नावे नोटरी अग्रीमेंट करून या फ्लॅटवर 12 लाखाचे कर्ज सध्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या यशवंत बँकेने बिल्डर कडे वर्ग केले मात्र या बँकेकडे कर्जाचा एकही हप्ता भरण्याबाबत कोणतीही काळजी कंपनीने घेतली नाही उलट त्यांना नोटरी करून दिलेला फ्लॅट हा दुसऱ्याला विक्री केला त्यामुळे आज अजय जाधव यांच्याकडे फ्लॅट पण नाही मात्र 28 लाख रुपयांच कर्ज त्यांच्या नावे पडल आहे
अजय जाधव यांच्या नावे घेतलेलं 12 लाखाच हे कर्ज आज 28 लाख झाल असून ही बँक आता बिल्डर सोडून अजय जाधव यांच्यावर वसुली साठी तगादा लावत आहे. त्यामुळे आदर्श च्या या सर्व संचालकांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अजय जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
आता जिल्हा पोलिस अधीक्षक या प्रकरणात कोणती भूमिका घेणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शिवाय अजूनही काही गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
