महाबळेश्वर प्रतिनिधी दिनांक ०५/०३/२०२६ रोजी सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा यांना अंबरग्रीस (व्हेल
माशाची उलटी) Sperm Whale (Physeter microcephalus) ची तस्करी होणार असले बाबतची
गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी
महाबळेश्वर (प्रा.), वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांनी महाबळेश्वर
वनपरिक्षेत्रामधील अधिकारी/कर्मचारी यांना सोबत घेऊन सापळा रचला. त्यानुसार संशयित इसम हे
महाबळेश्वर येथील वेण्णालेक व मेटतळे येथे आले असता, अचानक धाड टाकून ertiga वाहन क्रमांक MH-४३-
BK-९८६३, स्विफ्ट वाहन क्रमांक MH-०४-FR-०४३० व TATA Nexon वाहन क्रमांक MH-०७- एजी-
६००८ वाहनाची थांबवून तपासणी केली असता, इसम नामे (१) अतुल अशोक विश्वासराव रा. ठाणे पश्चिम,
(२) आकाश श्यामसुंदर धुरी, रा. मालवण, (३) एवझन क्लेमेंत फर्नांडीस, रा. मालवण, (४) हितेंद्र मनोहर
शेट्ये, रा. लालबाग परेल, (५) कौस्तुभ मिलिंद प्रभू रा. धनकवडी पुणे, (६) मोहन हरिभाऊ पाटील, रा.
भावेघर ठाणे व (७) विल्सन झुजे फर्नांडीस, रा. मालवण यांना ५.३०० किलो अंबरग्रीस व इतर
मुद्देमालासहित ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४,
४८अ, ५१ अन्वये वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) यांनी वनगुन्हा क्रमांक वप्रा – ०१/२०२६ नोंद केला
आहे. प्रकरणी अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) Sperm Whale (Physeter microcephalus) याची
तस्करी करण्यामध्ये इतर आरोपीचा सहभाग आहे काय? याबाबत शोध घेत असून याबाबतचा अधिकचा
तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) श्री. महादेव मोहिते हे करीत आहेत.
अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी ) Sperm Whale (Physeter microcephalus) हे वन्यजीव
(संरक्षण) अधिनियम १९७२, चे अनुसूची १ मध्ये समाविष्ट असून त्याची विक्री करणे, अवैध वाहतूक करणे,
सोबत बाळगणे व त्याचा व्यापार करणे इत्यादी कृत्ये ही उक्त अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन असून ते
दखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हा असून त्याकरिता किमान ३ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत कारावास तसेच रु.
२५०००/- द्रव्यदंड शिक्षेचे प्रावधान आहे. यास्तव कोणीही अशा प्रकारच्या वनगुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नये.
अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते, उपवनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रदीप
रौंधळ, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. महादेव मोहिते वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर
(प्रा.), श्री. गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा, श्री. सुनील लांडगे,
वनपाल महाबळेश्वर, श्री. तुकाराम निकम वनरक्षक तळदेव, श्री. बाबू मराडे वनरक्षक मांघर, श्री. देविंद्र
पोवार वनरक्षक हारोशी, श्री. अविनाश गवळी वनरक्षक शिरवली व इतर वन अधिकारी, कर्मचारी यांचे
उपस्थितीत करण्यात आली.
