(अजित जगताप) सातारा दि:- लोकशाही असलेल्या भारत देशात शिक्षण, नोकऱ्या, ग्रामपंचायतीपासून आरक्षणानुसार संधी दिली जाते. परंतू , दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षणापासून लांब ठेवले आहे. आता सातारा जिल्हा परिषदमध्ये स्विकृत सदस्य म्हणून दिव्यांगांचा प्रतिनिधी म्हणून अमोल निकम यांना संधी द्यावी .अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांकडून होत आहे.
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिव्यांग बांधवांसाठी अनेक मोर्चे, रॅली, आंदोलने झाली. यामध्ये दिव्यांग बांधव अमोल निकम हे प्रामुख्याने सहभागी होतात. दिव्यांगांची जाण असलेला व दिव्यांग बांधवांना कोणतीही अडचण असेल तर तेथे उच्चशिक्षित असलेले निकम हे हजर असतात. दिव्यांग बांधवांच्या सर्व व्यथा माहित असून राजकीय आरक्षणापासून लांब असलेल्या दिव्यांग बांधवांचा आवाज प्रत्येक सभागृहात घूमून त्यांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी ते धडपड करत आहेत. सातारा जिल्हा परिषद मध्ये स्विकृत सदस्य म्हणून अमोल निकम यांना संधी मिळावी म्हणून तमाम दिव्यांग बांधवांना महाराजाच्या राजधानीत न्याय द्यावा अशी मागणी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आली.
दिव्यांग बांधव स्विकृत सदस्य असणे आवश्यक आहे.अलिकडच्या काळात दिवसेंदिवस दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यांच्या अडचणीवेळी नेहमी शासकीय कार्यालय मध्ये अमोल निकम हे पाठपुरावा करत असतात. म्हणूनच त्यांना सातारा जिल्हा परिषदेमध्ये स्विकृत सदस्य म्हणून संधी मिळावी. या साठी जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव एकत्र आले आहेत. अशी माहिती श्री अमोल निकम यांनी दिली आहे. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अजय पवार, अमोल भातुसे, धर्मेंद्र कांबळे शैलेश बोर्डे व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
