सातारा समाचार : अंभेरी बनवा २१६दिनांक 04/03/2026 रोजी वनपरिक्षेत्र कोरेगाव मधील मौजे अंभेरी फॉ.कं.नं.216 चे वनक्षेत्रामध्ये वणवा लावणा-या आरोपीवर प्र.गु.रि. क्र. 01/2026
दि.04.03.2026 अन्वये वनगुन्हा नोंद करणेत आला असून, सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश राजाराम जातक, रा.अंभेरी, ता. कोरेगाव, जि. सातारा आहे. सदर घटनेमध्ये 10 हे. वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. वणवा वनविभागामार्फत तात्काळ विझवणेत आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपीवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ब) (फ) अन्वये
गुन्हा नोंद केला आहे. सदर वनगुन्हयासाठी 01 वर्षाचा कारावास किंवा 5000/- पर्यंतचा द्रव्य दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतुद आहे. कोरेगाव वनक्षेत्रातील नागरीकांना आव्हान करण्यात येते की, अवैधवृक्षतोड, अवैध शिकार, अवैध वाहतुक तसेच राखीव वनात अतिक्रमण करणे वणवा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे घडल्यास संबंधितांवर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते, (भा.व.से.) उपवनसंरक्षक, वनविभाग सातारा, श्री. दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा यांच्या
मार्गदर्शनाखाली श्री.चंद्रहार जगदाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) कोरेगाव, श्री. शिवाजीलटके, वनपाल कोरेगाव व श्री. रानबा बिक्कड, वनरक्षक एकंबे यांनी केली.
