कोरेगाव : श्री रंगनाथ स्वामींच्या कृपेने व मुक्या जनावरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला नवसंजीवनी लाभली, अशी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करत सौ. ललिता कैलास दाहिमा यांनी श्री रंगनाथ स्वामी देवस्थानाला ₹५१,००० चे द्रव्यदान अर्पण केले.अलीकडील काळात प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करत असताना श्री रंगनाथ स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्याने आणि सेवा-भावनेतून मुक्या जनावरांप्रती केलेल्या कार्यामुळे आपण पूर्णपणे बरे झालो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर देवस्थानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही देणगी अर्पण केली.
देवस्थानच्या वतीने सौ. दाहिमा यांच्या या उदात्त कार्याचे कौतुक करण्यात आले असून त्यांच्या दानामुळे देवस्थानातील विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र गोसावी उपस्थित होते. त्यांनीही सौ. दाहिमा यांच्या भावनेचे स्वागत करत समाजातील इतरांनीही अशा सेवाभावी कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या दानामुळे देवस्थान परिसरात भक्तांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सौ. ललिता दाहिमा यांच्या या कृतज्ञतापूर्ण कृतीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
