4 लाख 71 हजार 680 मुद्देमाल ताब्यात
तर एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल
कोरेगाव दिनाक 27
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर,कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या पथकाने सलग दोन दिवस विविध ठिकाणी असलेल्या जुगार अड्यावर छापे मारून रोख रक्कम,मोटरसायकल मोबाईल असा 4लाख 71 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून जवळपास 13 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने या भागात वाठार पोलिसांचे कौतुक होत आहे.
मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी वाठार पोलीस ठाणे हददीतील पाहीजे / फरारी आरोपी, चोरीच्या गुन्हयातील आरोपी तसेच अवैध्य धंदयांवर कारवाई करुन अवैध्य धंदे चालु न देण्यासाठी सक्त सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने श्री सुशिल भोसले सहायक पोलीस निरीक्षक वाठार पोलीस स्टेशन यांनी त्याचे डी.बी. पथकास योग्य असे मार्गदर्शन करुन पाहीजे/फरार आरोपी, चोरीच्या गुन्हयातील आरोपी तसेच अवैध्य धंदयांवर कारवाई करणेचे आदेश देवुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या.
दिनांक २७/०५/२०२६ रोजी श्री. सपोनि सुशील भोसले यांना गोपणिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की मौजे बिचुकले ता. कोरेगाव जि. सातारा गावचे हददीत पळसवाट नावाचे शिवारात काही लोक पैसे लावुन तीन पानी जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळताच त्यांनी पोउनि सातव व डी. बी. पथकास बोलावुन सदर ठिकाणी जावुन खात्री करा व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोहवा उदय जाधव यांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन पोलीस स्टाफ व पंच सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकुन ७ इसम जागीच पकडुन त्याचे नाव गाव विचारून त्यांचेकडे मिळुन आलेले जुगाराचे साहित्य, मोटार सायकली, डावात व अंगझडतीत मिळुन आलेली रोख रक्कम असा एकुण ३,४५,५००/- रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेवर वाठार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची खबर पोकॉ. विठठल काळे यांनी दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा जितेंद्र शिंदे हे करीत आहेत.
दरम्यान देऊर येथील बनवडी रोड नजीकच्या मळा येथील जुगार अड्यावर 26 रोजी कारवाई करत 6 जनावर गुन्हा दाखल झाला आहे.
