कोरेगाव दिनाक 4
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर, पोलीस अधिक्षक .डॉ.वैशाली कडुकर कोरेगाव उपविभागीय अधिकारी राजश्री तेरणी.यांच्या आदेशाने वाठार पोलिस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या टीम ने सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेस रंगेहात पकडून तिच्या कडून 931 ग्रॅम वजनाचा या अंदाजे 23 हजार 275 रुपये किमतीचा गांजा जप्त करून वाठार स्टेशन येथील एका 32 वर्षीय महिलेस अटक करून तिच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी बुधवार दिनांक 3 जून रोजी वाठार स्टेशन जवळ एक महिला गांजा विक्री करत असल्याची एक गोपनीय खबर वाठार पोलिस स्टेशन कडे मिळाल्या नंतर वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी आपल्याकडील डी बी टीम ला या बाबत तयार ठेवून घटनेची माहिती कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना दिली त्यांच्या आदेशाने वाठार स्टेशन नजिक एका 32 वर्षीय एक महीला तीचे जवळ एक पांढ-या बारदान्याची पिशवी घेवून बसून होती तीला महीला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेऊन तीचे नाव गाव विचारले असता तीने रुपाली लक्षमण बुधावले वय 32 वर्षे रा.वाठार स्टेशन ता.कोरेगाव जि.सातारा असे सांगीतले तीची व सोबत असलेल्या बारदान्याच्या पिशवीची तपासनी केली असता तीचेजवळ हिरवट रंगाचे पानेफले, बिया असलेले गांजा वनस्पतीचे शेंडे म्हणजेच उग्र वास येणारा ओलसर व वाळलेला गांजा 23,275/- रुपये किमतीचा व 931. ग्रॅम वजनाचा, मिळून आला असुन तो गृन्हयाचे पूढील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदर महिलेस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोरेगाव यांचेसमक्ष हजर ठेवले असुन तीस 02 दिवसांची ‘पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पी एस आय.गहिनीनाथ सातव हे करीत आहेत.
