सातारा दिनांक 3 सातारा वन विभाग, कराड वनपरिक्षेत्र अंतर्गत मसूर परिमंडळातील महावीर सॉ मिल आवारात अवैध बिगर पासी सागसाठा सापडलेले वरून महावीर सॉ मिल, मसूर सिल करून वन गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी मसूर येथील महावीर सॉ मिल येथे अवैध बिगरपासी सागसाठा असलेचे गुप्त माहितीवरून
समजले वरून तपास केल्यास सॉ मिल आवारात ०.४२४ घन मीटर इमारती नगवड तसेच ५.४८६ घ.मी. जळाऊ सागवान आढळून आले. रक्कम रू. १२३२०/- किंमतीचा मुद्देमाल माल असून वन विभागाने कारवाई करून माल जप्त करण्यात आला आहे. सदर सॉ मिल मा. उपवनसंरक्षक सातारा यांचे आदेशान्वये सिल करण्यात आली असून सॉ मिल मालक संतोष भाऊ पाटील रा. मसूर ता. कराड यांचेवर वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही मा.उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा गणेश महांगडे, वनपाल सुहास भोसले, वनपाल फिरते पथक श्री. बोडके, वनरक्षक शितल पाटील, वनरक्षक रोहन माने, वनरक्षक फिरते पथक रामचंद्र घुले, वनरक्षक फिरते पथक अश्विनी नागवे हे सहभागी होते. वनविभागाचे वतीने आव्हान करण्यात येते की, कुठल्याही प्रकारची अवैध वृक्षतोड, अवैध केल्यास संबंधितावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.
