सातारा समाचार न्यूज दिनांक 4
आसनगाव ता. कोरेगाव येथील श्रीकांत हणुमंत चव्हाण यांच्या शेतातील टरबूज चोरताना चोराला गावकर्यांनी रंगेहात पकडले. प्राथमिक माहिती अशी की श्रीकांत हणुमंत चव्हाण यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर टरबूज पिकाची लागण केली आहे.अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतून त्यांनी हे पिक वाढवले आहे. आज 3 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती शिवारात टरबूज तोडताना गावातील एका व्यक्तीला दिसला त्यांना त्यावर संशय आल्याने त्यांनी विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची व अरेरावीची भाषा केली त्यामुळे त्यांनी ही बाब श्रीकांत चव्हाण व गावातील काही नागरिकांना सांगितली त्यानंतर या सर्वांनी शिवाराकडे धाव घेत संबंधित चोराला पकडून गावात आणले व त्याच्याकडून चोरलेले टरबूजाची बॅग घेण्यात आली त्यानंतर याबाबत वाठार पोलीस स्टेशनला कळविण्यात आले घटनास्थळी वाठार पोलीस टिम दाखल झाली आरोपीला घेऊन टीमकडून अधिकचा तपास परीसरात घेण्यात आला.तत्पूर्वी गावातील परीसरात चोर्यांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब मानली जात आहे. या अगोदर देखील गावातील परीसरात लहान- मोठ्या चोर्यांची ग्रामस्थांनमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
