पर्यायी मार्गाचा वापर करा पोलीस अधीक्षक सातारा यांची अधिसूचना जारी
सातारा समाचार न्यूज दि 23
सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील, राष्ट्रीय महामार्ग १६५ डी (NH-१६५D) वर अनुक्रमे वाढे आणि वडूत गावा जवळ असलेले वेण्णा व कृष्णा नदीचे पूल हे ऐतिहासिक दगडी कमानीचे (Stone Masonry Arch) पूल आहेत. सदर पुलांची NHAI च्या प्रतिनिधींनी केलेल्या स्थळ पाहणी आणि तपशीलवार तपासणीवरून असे दिसून आले आहे की, मान्सून (पावसाळा) हंगामामुळे या पुलांची संरचनात्मक (structural) स्थिती अधिक खालावली आहे. पुलांमधून पाणी पाझर Content (seepages), किरकोळ संरचनात्मक तडे आणि कमानीच्या भागामध्ये झीज झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात सदर पुलांची संरचनात्मक चिंता वाढल्याचे लक्षात घेता सदर पुलावरून जाणारी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कार्यालय पुणे यांनी कळविले आहे. तसेच सदर ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांचेकडून प्राधान्य तत्त्वावर नवीन समांतर पुलांचे बांधकाम सुरू असून, नविन पुलांचे बांधकाम पुढील वर्षी पूर्ण झाले नंतर या जुन्या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे शक्य होईल असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कार्यालय पुणे यांनी पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सातारा ते लोणंद (NH-१६५D) या महामार्गावरील अवजड वाहतुकीचे खालीलप्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मी निखिल पिंगळे (भापोसे), पोलीस अधीक्षक सातारा मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा सातारा ते लोणंद (NH-१६५D) या राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतूक मार्गात बदल करून वाहतूक सुरळीत राहणेकरीता दि. २८/०९/२०२६ रोजीचे ००.०१ पासून ते २०/०६/२०२७ रोजीचे २३.५९ वा. पर्यंत खालील अधिसूचना पारित करीत आहे.
वाहनांच्या वाहतूक मार्गातील बदलाबाबत
वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
१. लोणंद वरून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने ही लोणंद वरून खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर महामार्गावरून साताऱ्याकडे जातील.
२. सातारायाकडून वाढे फाटा मार्गे लोणंद/फलटण कडे जाणारी अवजड वाहने ही वाढे फाट्यावरुन न वळता सरळ पुणे बेंगलोर महामार्गावरून खंडाळा/शिरवळ मार्गे लोणंद/फलटण कडे जातील.
३. सातारा बाजूकडून फलटण कडे जाणारी अवजड वाहतूक ही बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव – पुसेगाव – ताथवडे घाट मार्गे फलटण कडे जातील.
४. फलटण कडून सातारा कडे येणारी अवजड वाहने ही, फलटण – ताथवडे घाट – पुसेगाव – कोरेगाव वरून साताऱ्याकडे जातील.
५. फलटण बाजुकडून आळकी मार्गे साताऱ्याकडे येणारी अवजड वाहतूक ही आळकी फाटा (फौजी ढाबा) येथून
वाठार वरून पिंपोडे बु. – सर्कलवाडी – शिरगाव घाट – जोशीविहीर वरून पुणे बेंगलोर महामार्गावरून साताऱ्याकडे जातील, किंवा आळकी फाटा (फौजी ढाबा) येथून लोणंद वरून खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे
बेंगलोर महामार्गावरून साताऱ्याकडे जातील.
६. राष्ट्रीय महामार्ग १६५ डी (NH-१६५D) वर अनुक्रमे वाढे आणि वडूज गावा जवळ असलेले वेण्णा व
कृष्णा नदीवरील पूल हे अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
७. अत्यावश्यक सेवा मधील अवजड वाहने व शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांची व नागरीकांची, महिलांची
गैरसोय होवू नये या करीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कडील रा.प.बसेस व स्कुल बसेस
यांना राष्ट्रीय महामार्ग १६५ डी (NH-१६५D) या मार्गावरील अनुक्रमे वाढे आणि वडूज गावा जव असलेले वेण्णा व कृष्णा नदीवरील पुलावरून येण्यासाठी व जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
८. राष्ट्रीय महामार्ग १६५ डी (NH-१६५D) वरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांच्या वाहतूक मार्गातकोणताही बदल करण्यात आलेला नाही सर्व हलकी वाहने याच मार्गाने ये – जा करतील.
तरी वरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शकफलक व त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलासाठी सर्व
नागरीकानी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.
