(अजित जगताप) कोल्हापूर दि: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असतानाही महायुतीच्या काही नेत्यांची आभाळ फाटल्या सारखे अंदाज वर्तवण्यात येत होते. पण, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निकालाने अशा नेत्यांची चांगलीच चंपी झाली आहे. त्याचा फटका महायुतीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघात बसणार का? याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात व केंद्रात महायुतीचे तथा भाजपचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्यांना विकास व देश प्रेमापेक्षा इतर गोष्टींवर टीकाटिपणी करून लोकांची दिशाभूल केली जात होती. या जुमलेबाजीला लोक कंटाळल्यामुळे तरुण पिढीने नवी दिल्ली- मुंबई- पुणे आणि देशभरातून सरकारच्या विरोधात चले जाऊ चा नारा सुरू दिला आहे. तर काही गोष्टी शिकण्याऐवजी गोदी मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सरकारचे कोड कौतुक सुरू आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून समाज माध्यमातून आता सरकारच्या विरोधात प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम आता ग्रामीण भागातील निवडणुकीवर परावर्तित होऊ लागलेला आहे. भाजपचे संलग्न असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेक भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व हिंदुत्ववादी संघटना यांनी केंद्र व राज्यात सत्तेपर्यंत जाण्यासाठी सत्याची कास धरली होती. लोकांच्या अडीअडचणींचा अभ्यास करून प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता. २०१४ पासून सत्तांतर घडले. काँग्रेसमुक्त नारा दिला असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसमधील प्रस्थापित मंडळींचीच सध्या भाजपमध्ये आहे. सत्ता भोगणारे हेच… सत्ता गेल्यानंतर टीका करणारे हेच… आणि सत्तेत असणारे हेच… असा एक कलमी कार्यक्रम आता लोकांना नको आहे. सुज्ञ मतदार आता संधी मिळेल. त्या ठिकाणी भूमिका बजावत आहेत. सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या रिंगणामध्ये राजश्री शाहू शेतकरी आघाडीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाचे फटाके फोडले आहेत. यामुळे शिक्षक व पदवीधर मतदार संघातील प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांची धास्ती वाढली आहे. कोणत्याही निवडणुकीचा परिणाम हा थेट शिक्षक व पदवीधरांच्या मतपरिवर्तनाला कारणीभूत ठरत असतो. हे आता राजकीय अभ्यासातही मान्य करत आहेत. काही वेळेला सक्षम उमेदवार असूनही राजकीय पक्षाच्या अति आत्मविश्वास दाखवणार आहे. आशा नेत्यांमुळे चंपी होते. हे गोकुळच्या निकालाने स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही अभ्यास नसतानाही वल्गना करणाऱ्या नेत्यांमुळे सत्ताधारी पक्ष सुद्धा अडचणी येतात. कधी उमेदवार लादला गेला तरी पक्षाच्या धैर्य धोरणानुसार प्रचार करावा लागतो. आशिष तिची सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. आज गोकुळात रंग खेळतो हरी…. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी… असा आता म्हणावे वाटत आहे. गोकुळ मध्ये समविचारी तेरा जागा जिंकून आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
