दहिगाव येथील प्रचार रॅली दरम्यान उमेदवार अमित चव्हाण यांची प्रतिक्रिया
कोरेगाव दिनाक 25 उत्तर कोरेगाव तालुक्यातील रखडलेला विकास पाणी, रस्ते, औद्योगीकरण यासाठी केंद्र व राज्यातील सरकारकडून या भागासाठी जास्ती जास्त निधी उपलब्ध करून या भागाचा कायापालट करण्यासाठी माझी पक्षाने उमेदवारी दिली असून विकास विकास आणि विकास हाच अजेंडा घेऊन पिंपोडे बुद्रुक गटासह जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार अमित चव्हाण यांनी दहिगाव या ठिकाणी व्यक्त केले.
दहिगाव येथे मतदार भेटी प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले कोरेगाव तालुक्याचा हा भाग गेली अनेक वर्षापासून पाणी,रस्ते आणि औद्योगीक विकासापासून वंचित आहे या भागावर दुष्काळी भाग असा शिक्का पडला आहे तो पुसण्यासाठी या गटातील सर्व उमेदवारांना संधी द्या अशी भावनिक साद त्यांनी यावेळी मतदारांना केली.
यावेळी पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार शर्वरी अमोल निकम,फलटण तालुका भाजप अध्यक्ष अमित रनवरे,भाजप नेते विजयकाका चव्हाण,सह्याद्री बँकेचे चेअरमन रामबाबा चव्हाण,भाजप नेते दीपक पिसाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
