वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी उमेदवाराबाबत मतदारांमध्ये चर्चा..
वाठार स्टेशन प्रतिनिधी
कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य सुनीता धनाजी मोहिते या ओबीसी उमेदवाराला या मतदार संघात उमेदवारी दिल्याने या गटातील जनता मोहिते या उमेदवाराच्या पाठीशी ठाम भूमिका घेत आम्हाला पैसेवाला राजा नको तर मनाने श्रीमंत असलेला आपला राजा हवा अशा प्रतिक्रिया या गटातील मतदार व्यक्त करीत आहेत.
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून शिवसेना भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आता या गटातून प्रचाराला सुरुवात केली आहे .
मतदार भेटी दरम्यान त्यांना गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत असल्याने या गटातून त्यांच्या विजयाची वाट मोकळी झाली आहे.
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील बिचुकले,देऊर,वाठार गावात मतदार भेटी आणि उमेदवार परिचय साठी सुनीता मोहिते यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाचा सर्वागीण विकास करण्यासाठी मी उभी असून मतदारांच्या मूलभूत प्रश्न ना माझ्याकडून न्याय दिला जाईल”
सुनीता धनाजी मोहिते
वाठार स्टेशन गट उमेदवार शिवसेना
