कोरेगाव राजकीय रणांगण तापलं……
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार
संजय कदम कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या एकूण 6 जिल्हा परिषद गटात वेगवेगळ्या आघाड्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळुन निघाले आहे
एकूण 6 जिल्हा परिषद गटासाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 12 गणा साठी 87 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने सर्वच राजकीय गटात लक्षवेधी लढती होणार आहेत.
कोरेगाव उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असताना शेजारील वाठार स्टेशन गटात शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र येणार आहे हे दोन्ही गट फलटण विधानसभा मतदार संघात आहेत जिल्ह्यातील एकूण 6 गटापैकी केवळ वाठार स्टे गटात ओबीसी महिला हे आरक्षण असल्याने या गटात या जागेसाठी ओबीसी विरोधात मराठा कुणबी अशी लढत होत आहे याच गटातील अंबवडे हा एक गण शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात आहे हा गण ओबीसी पुरुष आरक्षित झाला आहे या ठिकाणी ही ओबीसी विरोधात मराठा कुणबी अशी लढत असल्याने कोरेगाव तालुक्यातील हा गट सध्या जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी ठरला आहे.
सातारा रोड जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आहे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गट असा सामना होणार आहे.हीच परस्थिती कुमठे , एकंबे या तिन्ही गटात राहणार आहे तर कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागात वाठार किरोली हा गट कराड उत्तर गटात असल्याने या ठिकाणी भाजपा आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होईल
एकूणच जिल्ह्यात सर्वत्र भाजपा स्वबळावर ही निवडणूक लढवत असली तरी कोरेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गट भाजपा सोबत आहे.त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी विरोधात आमदार महेश शिंदे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
जिल्ह्यातील कोरेगाव हा राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे पुन्हा एकदा जाहीर झाले आहे.
………………
About the Author
Post Views: 87
