कोरेगाव दिनाक 31
कोरेगाव तालुका ज्याप्रमाणे विकासाचा रोल मॉडेल ठरत असताना जे कोरेगाव मध्ये ते वाठार स्टेशन मध्ये असेल मी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष झालो त्यावेळी तालुक्याला सव्वा दोन टी एम सी अधिकच पाणी मंजूर करून घेतलं वनगळ सिंचन योजना अस्तित्वात आली आता या योजनेतून वसना उपसा सिंचन योजनेच्या कामात दुरुस्ती करून 6 फुटाच्या पाईप टाकून या योजनेतून अरबवाडी तलाव आणि सोळशी तलाव भरला जाईल तर जिहे काठापूर मधुन पाणी रामोशीवाडी आणि हिवरे तलावात आणि आज पासून 24 महिन्यात हे पाणी नलवडेवाडी तलावात सोडले जाईल तेथून ते देऊर मधील तलावात आणि येथून आपल्या विखळे जाधववाडी फडतरवाडी तलावात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी वाठार स्टेशन येथील जाहीर सभेत बोलताना दिला.
वाठार स्टे येथील जिल्हा परिषद उमेदवार सुनीता धनाजी मोहिते आणि पंचायत समिती उमेदवार अनिता अरुण भोईटे यांच्या प्रचार. सभेत ते बोलत होते.यावेळी भाजपा कोरेगाव तालुका अध्यक्ष संजय काटकर,शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रकात पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम,धनाजी मोहिते,धनसिंग कदम प्रदीप कदम,राजेश काळोखे , यशवंत पवार,नितीन चव्हाण, मंगेश शितोळे भाजप,शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी आमदार महेश शिंदे यांनी या गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा खरपूस समाचार घेतला शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने भाषणाची सुरुवात करायची आणि त्यांचीच गळचेपी करायची अशी या पक्षाची धारणा आहे.या गटात आणि तालुक्यात धनदांडग्या बाहेरच्या लोकांना पैशाच्या जोरावर उमेदवारी देऊन या लोकांनी मिलेनियर क्लब स्थापन केला आहे.इतका पैसा होता तर कोरोना काळात ही लोक कुठ लपून बसली होती असा आरोप या वेळी जाहीर सभेत केला.
यावेळी राजेश काळोखे यांनी प्रस्ताविक केले तर यावेळी बाळासाहेब देशमुख,प्रदीप कदम,शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश फडतरे,यांनी मनोगत व्यक्त के
ले.
