की
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात उत्सुकता..
वाठार स्टेशन गटातील रामसेना नक्की कोणासोबत..
कोरेगाव संजय कदम दिनाक 29
सातारा जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी ठरलेल्या वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होत असताना नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण घेतलेल्या रामराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार दीपक चव्हाण,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाठार स्टेशन येथील गट या निवडणूकीत वाठार स्टेशन मधील शिवसेना उमेदवारास किती टक्के मताधिक्य देणार याची उत्सुकता या गटातील लोकांना लागली आहे.
राष्ट्रवादी मधील विभागणी नंतर विधान सभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत राहण्याची भुमिका घेतली यावेळी रामराजे यांचे राजकीय विरोधक भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सचिन पाटील यांना फलटण मधील उमेदवारी दिली यावेळी ही उमेदवारी महायुती मधील अजित पवार गटाला मिळाली यामुळे सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी घड्याळावर निवडणूक लढवून ते विजयी झाले त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत रामराजे अजित पवार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतील अशी परिस्थिती असताना नगरपालिका निवडणुकीत त्यांना घड्याळ चिन्ह देण्यावर विरोध झाला त्यामुळे रामराजे यांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पारडे जिल्ह्यात जड झाले दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षाची वाढ करण्यासाठी रामराजे गटाने निस्वार्थपणे काम करावे असे सांगत या बैठकीला वाठार स्टेशन गटातील रामराजे गटाचे सर्व कार्यकर्ते हजर होते यावेळी शिवसेना देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी रामराजे निंबाळकर राजे गटावरती आली.
दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर गटाकडून वाठार गटात गणासाठी अजित भोईटे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊ केली होती त्यानंतर झालेल्या घडामोडी त त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली अशावेळी सध्या रामराजे गटाकडे एकही उमेदवार रिंगणात नाही मात्र येथील जिल्हा परिषद गटाला आमदार महेश शिंदे यांनी धनुष्यबाणाचे चिन्हावर उमेदवार देऊ केला आहे त्यामुळे गट कोणाचा जरी असला तरी पक्षाच्या धनुष्यबाणासाठी रामराजे गट सोबत येणार का ? धनुष्यबाण विजयी करण्यासाठी काम करणार का? हा कळीचा मुद्दा आहे त्यामुळे येथील रामसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणासोबत सध्या तरी दिसत नाहीत त्यामुळे रामराजे गट जो निवडणुकीच्या जिल्हा बैठकीला उपस्थित होता तो आता काय भूमिका घेणार धनुष्यबाणाला किती मतदान करणार नाईक निंबाळकर वाठार स्टेशन मधील गटातील उमेदवाराला या गटातून मताधिक्क देऊन करणार का? आज रामेराजेंची या गटातील सेना नक्की कुणाच्या प्रचारात आहे याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाठार स्टेशन गटात रामराजेंचे राजकीय विरोधक भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यासोबत या गटात युती केली आहे त्यामुळे या गटात रामराजेची भूमिका काय राहणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे..
About the Author
Post Views: 279
