कोरेगाव दिनाक 26
:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कै. मानकाताई बर्गे मेडिकल फाऊंडेशन,जिजाऊ महोत्सव समिती, इनरव्हील क्लब,भारतमाता मित्र मंडळ कोरेगाव व कार्यक्षम नगरसेविका सौ. अर्चना ताई किरण बर्गे यांच्या वतीने रोटरी गार्डन येथे खास महिलांसाठी भव्य दिव्य अशा होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे चार हजार महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे व मानाच्या पैठण्या देण्यात आल्या.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या सुविज्ञ पत्नी व सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. सोनिया ताई जयकुमार गोरे,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया ताई महेश शिंदे,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, रहिमतपुर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.वैशाली निलेश माने,सिने अभिनेत्री तेजल शिंदे व टीव्ही स्टार,निर्माते दीपक साबळे आदींची उपस्थिती होती.
होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा कार्यक्रमात शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. सिने अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी तेजल शिंदे हिच्या धमाकेदार लावण्यांसोबत नृत्याचा आनंद घेऊन कोरेगाव नगरीतील महिलांनी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.अर्चना खंडाईत ठरल्या होम मिनिस्टर जिंकले पहिले बक्षीस,त्याचबरोबर रेश्मा बर्गे,स्नेहल बोबडे,संगीता बर्गे,मीनाक्षी वाघेरे,जयश्री ओसवाल,सुषमा पाटे,ज्योती बर्गे,संगीता घाडगे,मिरा सोडमिसे या महिलांनी ही अनुक्रमे नंबर जिंकत विविध बक्षिसे जिंकली.उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉ द्वारे निघणाऱ्या चिट्टी तील नाव निघालेल्या महिलांना आकर्षक पैठ्ण्या वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमाचे आयोजक कार्यक्षम नगरसेविका सौ.अर्चना ताई किरण बर्गे व माजी जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण नाना बर्गे या दाम्पत्याचे उपस्थित हजारों महिलांकडून आभार मानण्यात आले व दरवर्षी महिला दिनाला अशा भव्य दिव्य कार्यक्रम भरवण्याची मागणी करण्यात आली .
विविध समाजउपयोगी उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत कोरेगाव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या नगरसेविका अर्चना किरण बर्गे व जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण नाना बर्गे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे ही उपस्थित हजारोंची गर्दीच सांगत आहे.
डॉ.सौ. प्रिया ताई महेशशिंदे
