राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाणेर क्रीडा मंडळ बाणेर संघ विजेता तर वाघेश्वर संघ चरोली उपविजेता
कोरेगाव दिनांक 13
धार्मिक , शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र देऊर .नगरीत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री मुधाई देवी कबड्डी संघ देऊर व धनसिंग सदाशिव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देऊर येथील ग्रामपंचायत चौकात मॅटवरील भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत राज्यातील नावाजलेल्या 12 संघानी सहभाग घेतला यामध्ये अंतिम सामन्यात बाणेर पुणे क्रीडा मंडळ संघाने वाघेश्वर क्रीडा मंडळ चरोली या संघाचा 6 गुणांनी पराभव करत विजेता तर वाघेश्वर क्रीडा मंडळ चरोली हा उप विजेता ठरला या स्पर्धेत कासेगाव जिल्हा सांगली संघाने तृतीय तर मुधाई कबड्डी संघ देऊर संघास चौथ्या क्रमांकावर समाधान मानव लागलं सर्व संघाना चषक व रोख रक्कम देऊन यावेळी गौरवण्यात आले प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे 21हजार 56,द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार56,तर तृतीय क्रमांक साठी 11 हजार 56 व चौथ्या क्रमांकासाठी 7 हजार 56 अशी रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी या स्पर्धेचे आयोजक धनसिंग कदम म्हणाले देऊर ही जशी धार्मिक नगरी आहे तशी क्रीडा संस्कृती जोपासना करणारी क्रीडा नगरी आहे या गावाने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय व देशपातळीवर खेळाडू घडवले आहेत ग्रामीण भागात अलीकडच्या काळात मर्दानी खेळाची मैदान ओस पडली आहेत या साठी कबड्डी सारखे सामने भरवणे ही आता काळाची गरच बनली आहे यासाठी यापुढील काळात ही क्रीडा संस्कृति जोपासण्याचे काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यावेळी पंच म्हणून प्राध्यापक तानाजी साबळे,प्राध्यापक टी एम कदम,प्राध्यापक मनेश धुमाळ,प्रा.संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर युवा नेते प्रदीप कदम,अजित कदम यांनी सूत्रसंचालन केले बक्षिस वितरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विकास कदम, सह्याद्री सहकारी बँकेचे माजी संचालक दिलीप कदम,यात्रा कमिटी अध्यक्ष योगेश कदम, रजनीकांत गांधी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.
