
आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला अजून अवकाश आहे.त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या मालकी हक्काबाबत सध्या मोठी घडामोड समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी आरसीबी संघ विकत घेण्यासाठी बोली लावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे असे जर झाल्यास बंगळुरू टीम मुंबईची होणार आहे.
आरसीबीचे सध्याचे मालक ‘युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड’ (USL) असून त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच नवीन मालकाचा शोध सुरू केला होता. कंपनीच्या मते, क्रिकेट हा त्यांच्या मद्य व्यवसायाचा मुख्य भाग नसल्याने ते हा संघ विकून व्यवसायाचे धोरणात्मक नियोजन करत आहेत.
