रास्ता रोको करीत ग्रामस्थानी दिला काम बंद करण्याचा इशारा
कोरेगाव दिनाक 24
सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या कामात सुधारणा न झाल्यास झालेलं काम उखडुन टाकू असा इशारा आज अंबवडे संमत वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.
गेली दोन वर्षापासून सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम हैदराबाद येथील के सी पी एल या कंपनीकडे दिले आहे मात्र हे काम सुरू झाल्यापासून ते अंबवडे गावापर्यंत हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाण्यासाठी भलीमोठी नाली बांधण्यात आली आहे मात्र या नाल्यावर काम सुरू केल्यापासून पाणी मारले नसल्याने या नाल्यात पडून अनेक अपघात झाले आहेत याशिवाय या रस्त्याकडेला सर्व ऊस शेती आहे असे असताना नाली वर टाकलेला स्लॅब हा कमी जाडीचा आहे त्यामुळे यावरून कोणतही वाहन गेलं तरी या नाल्यात अडकत आहे याशिवाय गाव शाळा उद्योग व्यवसाय ठिकाणी ही अशीच परस्थिती आहे त्यामुळे या कामाची सुधारणा व्हावी या साठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरेगाव पंचायत समिती सदस्य निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरसिंग दिसले,नाना भिलारे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
सकाळी 11 वाजता येथील अंबवडे संमत वाघोली येथे कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, के शी पी एल चे अजित शिंगटे यांनी ग्रामस्थांच्या आरोपांची उत्तरे दिली मात्र दिलेली उत्तर ही समाधान कारक नसल्याने ग्रामस्थानी आक्रमक पवित्रा घेत या भागातील प्रमुख लोकांसोबत एक मुख्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावावी नंतरच या पुढ काम करावे असा इशारा दिला
