मुधाई देवस्थानचे व्यवस्थापक गुलाबसिंग कदम
कोरेगाव दिनांक 14 कोरेगाव तालुक्यातील मुधाई देवी मंदिरात चुकीच्या पद्धतीने बसवलेला प्रशासकास तत्काळ उचलून ज्या जागेत त्यांचे ट्रस्ट आहे त्या जागी स्थलांतरित करावे अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील श्रीमुदायी देवी देवस्थानचे सेवेकरी यांनी पत्रकार परिषदेत केली
वाठार स्टे येथे देऊर येथील श्री मुधाई देवी मंदिरात तत्कालीन धर्मादाय आयुक्तानी चुकीच्या पद्धतीने नेमलेले प्रशासक यांना त्यांच्या जागेत बसवून सेवा करण्याची संधी द्यावी अशी जोरदार मागणी या देवस्थानचे सेवेकरी यांनी करीत तत्कालीन धर्मादाय आयुक्ततांच्या एककली हुकूमशाही कारभाराचा निषेध व्यक्त केला.
देऊर (ता. कोरेगाव) येथील ऐतिहासिक श्री मुधाईदेवी देवस्थानच्या मालमत्ता आणि जमिनीच्या हक्कांसंदर्भात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काही व्यक्तींनी स्थापन केलेले ट्रस्ट हे खाजगी ट्रस्ट आहेत. शेतजमिनी दाखवून नोंद केलेले हे ट्रस्ट मूळ श्री मुधाईदेवी मंदिराचेच असल्याचे भासवून विरोधकांकडून ग्रामस्थ व भाविकांची दिशाभूल केली जात आहे. या खाजगी ट्रस्टच्या आडून मंदिराची मालमत्ता आणि गोरगरीब, बारा बलुतेदारांच्या जमिनी यावर हक्क सांगण्याची परिस्थिती तयार झाल्याचा आरोप देऊर येथील ग्रामस्थ गुलाबसिंग कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर करताना गुलाबसिंग कदम यांनी स्पष्ट केले की, देऊर येथील श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची संपूर्ण अचल संपत्ती—ज्यामध्ये श्री मुधाईदेवी मंदिर, आजूबाजूचा परिसर, राजवाडा आणि शेतजमीन समाविष्ट आहे—ही नागपूर येथील ‘मॅनेजर कोर्ट ऑफ वॉर्ड्स’च्या नियंत्रणाखाली आहे. नागपूर तहसीलदार तथा मॅनेजर, कोर्ट ऑफ वॉर्ड्स यांच्या दि. १९/०८/२०२६ च्या अधिकृत पत्राचा (FD No. 16/1961) दाखला देत, ही मालमत्ता सहदिवाणी न्यायालय नागपूर येथे प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विरोधकांनी स्वतःच्या खाजगी जमिनी दाखवून मूळ मंदिरावर बेकायदेशीरपणे प्रशासक आणला आहे. त्यामुळे प्रशासकाला तात्काळ त्यांच्या खाजगी ट्रस्टच्या जागेत बसवावे आणि मुख्य श्री मुधाईदेवी मंदिर लवकरात लवकर प्रशासकमुक्त करावे, अशी आग्रही मागणी गुलाबसिंग कदम यांनी केली.
यावेळी ओंकार पोरे म्हणले सुरुवातीला गावातील काहीव्यक्तींना केवळ देवीला तेल, साडी-चोळी अर्पण करणे आणि धार्मिक सेवा करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्या होत्या. त्यासाठी त्यांना काही शेतजमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे याच लोकांनी त्या शेतजमिनीचे दोन स्वतंत्र खाजगी ट्रस्ट तयार केले.आता हेच ट्रस्ट मुख्य मंदिराचे मालक असल्याचा आव आणत मंदिराच्या मूळ मालमत्तेवर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर व परिसर आजही भोसले घराण्याचे असताना त्या ट्रस्टमुळे दिशाभूल होत आहे त्यामुळे या दोन्ही खाजगी ट्रस्टच्या स्थापनेची, नोंदणीची आणि मालमत्तांवरील अधिकारांची सखोल चौकशी धर्मादाय विभागाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मंगेश गुरव यावेळी म्हणाले, सातारा येथील तत्कालीन सहधर्मादाय आयुक्तांच्या कार्यकाळातील प्रशासकीय निर्णयांवर आणि प्रशासक नियुक्तीच्या प्रक्रियेवरही ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवले. ट्रस्ट खाजगी शेतजमिनीचे आहे मात्र प्रशासक मंदिरात बसवण्यात आला जे भोसले घराण्याकडे आहे. पूर्वीच्या कारवाईत ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता मंदिरातील अधिकृत फलक हटवण्यात आले व नवीन फलक लावून देणग्या गोळा करण्यास सुरुवात झाली, असा आरोप करण्यात आला. तथापि, सध्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांना या प्रकरणात पक्षकार (Party) म्हणून सामावून घेतले असून आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे सांगत, आता या प्रकरणात सत्य समोर येऊन निष्पक्ष न्याय मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा वाद केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून गावातील बारा बलुतेदार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शेतजमिनींवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महसूल अभिलेखांच्या (Revenue Records) आधारे सर्व जमिनींच्या नोंदींची पडताळणी करून गोरगरिबांच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली असून, या प्रकरणात संबंधित ट्रस्ट किंवा धर्मादाय प्रशासनाची बाजू समोर आल्यास तीसुद्धा मांडली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला गुलाबसिंग बापू कदम, शांताराम दोरके, मंगेश गुरव , ओमकार पोरे, प्रीतम भांडवलकर, सागर कदम, सचिन कदम,राजेंद्र गुरव, नंदकुमार महामुनी, केशव देशमुख, ओंकार देशमाने, मच्छिंद्र गुरव, वसंत गुरव, दिपक पोरे, प्रसाद पोरे, डॉ. प्रियंका कदम आणि योगेश गुरव यांच्यासह देऊर येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
